जी कल्पना पुरेपूर कसोटीवर उतरते ते सत्य. ‘संपूर्ण सत्य’ ही चुकीची संकल्पना आहे. कारण त्याची पडताळणी होत नाही
गोरांनी नास्तिक विचारांना व्यापक करण्याचा गंभीरपणे प्रयत्न केला. ते मानत की हिंदू, मुस्लीम, शीख, जैन, ख्रिश्चन ही माणसांना लागलेली वेगवेगळी लेबले आहेत. ही लेबले भेदभाव करतात. मी कोण आहे, हे सांगताना, मी कोण नाही, हे जास्त सांगत असतो. ही सर्व लेबले ईश्वराची जोडलेली आहे आणि माणसे ईश्वराची गुलाम आहेत.......